प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या हस्ते रविंद्र झाल्टे व चंद्रकांत बाविस्कर यांचा सत्कार...।
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या हस्ते रविंद्र झाल्टे व चंद्रकांत बाविस्कर यांचा सत्कार...।
विभागीय कार्यशाळेत जामनेर तालुक्याचा सभासद नोंदणी अभियानात मोठी कामगिरी.। उत्तर महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर स्थान.।
मुख्य संपादक/शांताराम झाल्टे
जळगाव | भाजपा संघटन पर्व अंतर्गत आयोजित विभागीय कार्यशाळेत जामनेर तालुक्याने सभासद नोंदणी अभियानात मोठी कामगिरी केली असून, उत्तर महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. तालुक्याने 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याने पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने विशेष सन्मान करत मंडल अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर आणि शहराध्यक्ष रविंद्र झाल्टे यांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांसह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षसंघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबवला जात असून, जामनेर तालुक्याच्या या यशाने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
संघटन पर्वाच्या माध्यमातून पक्षबांधणीला चालना देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, जामनेर तालुक्याने केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. या अभियानात तालुक्यातील कार्यकर्त्यांचा योगदान महत्त्वाचा ठरला असून, भविष्यातही असेच संघटन मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आले.