जळगांव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तसेच तापी मेगा रिचार्ज योजनेस गती देणे बाबत केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.रक्षाताई खडसे यांनी घेतली, केंद्रीय जलशक्ती मंत्री मा.श्री.सी.आर.पाटील यांची भेट...।
जळगांव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तसेच तापी मेगा रिचार्ज योजनेस गती देणे बाबत केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.रक्षाताई खडसे यांनी घेतली, केंद्रीय जलशक्ती मंत्री मा.श्री.सी.आर.पाटील यांची भेट...।
मुख्य संपादक/शांताराम झाल्टे
जळगांव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना गती देण्याच्या दृष्टीने तसेच महात्वाकांशी तापी मेगा रिचार्ज प्रकल्पांच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.रक्षाताई खडसे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री मा.श्री.सी.आर.पाटील यांचेसमवेत सविस्तर बैठक घेऊन सांगोपांग चर्चा केली.
यावेळी महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याची महत्वाकांशी योजना तापी मेगा रिचार्ज बाबत महाकाय पुनर्भरण इंटरस्टेट कॉनहोल बोर्ड (MS-MP) संगती मिळण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाकडून प्रयत्न होणेबाबत आग्रह धरुन सदर प्रकल्पास केंद्रीय जलआयोगाची मान्यता मिळणेबाबत विनंती केली असून, दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सदर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होणेसाठी सकारात्मक व प्रयत्नशील आहे.
तसेच चर्चेत मुक्ताईनगर उपसा सिंचन योजनेचे संपूर्ण दुरुस्तीचे काम पूर्ण करून लाभधारकांचे संमतीनुसार प्रत्येकी ५ हेक्टर साठी एक शेततळे यानुसार संकल्पना मांडली जेणेकरून, सुमारे ४००० हेक्टर क्षेत्रातील लाभधारकांना Water Bank उपलब्ध होऊन पीक घेव्याचे स्वातंत्र निर्माण होईल. तसेच निम्न तापी प्रकल्प प्रकल्पाचे प्राधान्याने पंतप्रधान कृषी सिंचाई योजना मध्ये समावेश होण्यासाठी PIB ची बैठक तातडीने घेणेबाबत केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.रक्षाताई खडसे यांनी विनंती केली.
तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील अस्तित्वातील पाझर तलावांचे साठवण तलावात रुपांतर करून पाणीसाठा रब्बी हंगामापर्यंत राहील या दृष्यने नियोजन होणेबाबत निर्णय होवून यासाठी केंद्राकडून आवश्यक मदत मिळोबाबत चर्चा झाली व अस्तित्वातील तलावांचा खालील बाजूस पुनर्भरण होणेच्या दृष्टीने Recharge Wells, Recharge shaft, Slim hole, continuous contour trenching या सारखी बांधकामे हाती घेणे बाबत चर्चा होऊन केंद्रीय जलशक्ती मंत्री मा.श्री.सी.आर.पाटील यांनी सर्व प्रकल्पाबाबत सकारात्मकता दर्शवून तातडीने कार्यवाही करणे बाबत संबंधितांना सूचना केल्या.