म्हसावद येथील माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांंचा निरोप समारंभ संपन्न...।
प्रश्न विचारणे ही ज्ञानाच्या शोधाची पहिली पायरी आहे - वक्ते सतिष शिंदे ।
मुख्य संपादक/शांताराम झाल्टे
एरंडोल : म्हसावद येथील माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला प्रसंगी वक्ते सतिष शिंदे यांचे शैक्षणिक प्रबोधन पर व्याख्यान आयोजन करण्यात आले होते .यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री पंकजराव भिकनराव साळुंखे हे उपस्थित होते. तसेच प्रमुख मान्यवर म्हणून वक्ते सतिष शिंदे यांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपण आपल्या यशाच्या शिखर गाठण्यासाठी यथोचित प्रयत्न केले तर तुम्हाला यश मिळवण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही असे प्रतिपादन यावेळेस केले. तसेच ऐतिहासिक व वैज्ञानिक उदाहरण दाखले देत विद्यार्थ्यांनी उपाययोजना कशी करावी यावर मार्गदर्शन केले.
तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री पंकजराव साळुंखे यांनी आपल्या मनोगततातून संस्थेची वाटचाल व विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश यावर प्रकाशझोत टाकत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाप्रसंगी सौ . दिपाली पंकजराव साळुंखे मॅडम मुख्याध्यापिका प्राथमिक विभाग , श्री समाधान बाविस्कर सर मुख्याध्यापक माध्यमिक विभाग , श्री शरद ठोंबरे सर, श्री संदीप कांडेकर सर, श्री राजेंद्र जोगी सर ,श्री प्रशांत पाटील सर आदींसह प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. निरोप समारंभाच्या ओचित्य साधत मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना भेट स्वरूपामध्ये पेन बक्षीस देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला .
सूत्रसंचालन भारती महाले मॅडम
आभार तर हर्षदा बोरसे मॅडम यांनी केले