हिंदुस्थानातील अंतरराष्ट्रीय ऐतिहासिक कुस्ती दंगलचा जामनेरात रंगणार धुमधडाका...। नमो कुस्ती महाकुंभ-२ देवाभाऊ केसरी.।

हिंदुस्थानातील अंतरराष्ट्रीय ऐतिहासिक कुस्ती दंगलचा जामनेरात रंगणार धुमधडाका...। नमो कुस्ती महाकुंभ-२ देवाभाऊ केसरी.।
मंत्री गिरिशभाऊ महाजन यांच्या वतीने जामनेर नगरीत भव्य कुस्त्यांच्या दंगलीसाठी येणार्या सर्व मान्यवरांचे व मा.मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांचे हार्दिक स्वागत.।

नऊ देश एक रंग भूमि भारत, फ्रांस,मोल्दोवा,उझबेकिस्तान, रोमानिया, एस्टोनिया,इराण,ब्राझील,जाॅर्जिया देशांतील पैलवानांचा समावेश.।

कुस्ती दंगलमध्ये पहिली आणि शेवटची कुस्ती लढणार महिला पैलवान.।

महामल्लांचा थरारक कुस्ती मुकाबला /पंरपरा ताकद आणि शौर्यांचा संगम!

मुख्य संपादक/शांताराम झाल्टे 

 दि.१६ वार रविवार रोजी येथील हिवरखेडा रोड गोविंद महाराज संस्थानच्या पटांगणा येथे ना. गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रयत्नाने नमो कुस्ती स्पर्धेचा महाकुंभ,देवा भाऊ कुस्ती स्पर्धा पर्व ०२ चे आयोजन करण्यात आलेले आहेत.।
या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मंत्रीमंडळातील दिग्गज मंत्री जामनेरात उपस्थीत राहणार आहे.।

कुस्तीच्या महाकुंभात देश विदेशातील मल्ल सहभागी होणार आहे तसेच यावेळी महिला कुस्तीला मिळणार आहे आदर आणि सन्मान।

१६ फेब्रुवारीला 'नमो कुस्ती महाकुंभ'सोबत 'देवाभाऊ केसरी' ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड, शिवराज राक्षेसह भारतातील नामवंत पैलवान आंतरराष्ट्रीय पैलवानांशी भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. 
स्पर्धेत प्रमुख 22 लढतींसह 300 पैलवानांच्याही कुस्त्या लावल्या जाणार आहेत. तसेच भारतासह, फ्रान्स, उझबेकिस्तान, रोमानिया आणि एस्टोनिया या देशांचे जागतिक विजेते,अर्जुन पुरस्कार विजेते, हिंद केसरी, रुस्तुम ए हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी,ऑलिम्पियन, हिंद केसरी महिला आणि पुरुष दिग्गज कुस्तीपटू सहभागी होणार आहेत.

याठिकाणी सन्मानिय आमदार ,जामनेर नगरीतील नगरसेवक ,जि.परिषद सदस्य ,पंचायत समिति सदस्य व तसेच आदि पदाधिकारी यांची उपस्थिती प्रमुख उपस्थिती राहणार असून स्वागतोत्सुक भारतीय जनता पार्टी जामनेर तालूका पदाधिकारी व कार्यकर्तें यांच्या कडून करण्यात येत आहे.।

Comments

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।