रावेर लोकसभा क्षेत्रातील विकास कामे व केंद्र सरकार पुरस्कृत विविध योजनांचा केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.रक्षाताई खडसे यांनी घेतला आढवा...।

रावेर लोकसभा क्षेत्रातील विकास कामे व केंद्र सरकार पुरस्कृत विविध योजनांचा केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.रक्षाताई खडसे यांनी घेतला आढवा...।
मुख्य संपादक/शांताराम झाल्टे 
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे आज केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.श्रीमती रक्षाताई खडसे यांनी रावेर लोकसभा क्षेत्र अंतर्गत सुरु असलेल्या विविध विकास कामे तसेच केंद्र सरकार पुरस्कृत विविध योजना बाबत बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी “प्रधानमंत्री आवास योजना” व “प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान”, “सुधारित वितरण क्षेत्र योजना (RDSS)” व बीएसएनएल संबंधित विकास कामांबाबत आढावा घेऊन योग्यत्या सूचना देऊन, प्रगतीपथावर असलेले विकास कामे लवकर मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.

तसेच यावल येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालय चे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय मध्ये श्रेणीवर्धन झालेले असून, रुग्णालय मुख्य इमारत व कर्मचारी निवासस्थाने बांधकाम करणेसाठी तसेच फैजपूर(यावल) येथे मंजूर प्रांत कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी आवश्यक अतिरिक्त शासकीय जागा लवकर उपलब्ध होणेबाबत त्यांनी संबंधितांना सूचना केल्या. 

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मा.ना. श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह, वस्त्रोद्योग मंत्री मा.श्री.संजयजी सावकारे, जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित व संबधित विभागाचे अधिकाती उपस्थित होते.

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।