उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती यांच्या अध्यक्षतेखाली जातीय सलोखा वृध्दीगत होण्यासाठी तालुकास्तरीय कार्यशाळा जामनेर पंचायत समिति येथे आयोजित...।
उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती यांच्या अध्यक्षतेखाली जातीय सलोखा वृध्दीगत होण्यासाठी तालुकास्तरीय कार्यशाळा जामनेर पंचायत समिति येथे आयोजित...।
मुख्य संपादक/शांताराम झाल्टे
अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 व सुधारणा नियम 2016 च्या अंमलबजावणी बाबत पंचायत समिती हॉल पंचायत समिती जामनेर येथे दि. 04/02/2025 रोजी दुपारी 3:30 वा.मा.श्री. विनय गोसावी, उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती यांचे अध्यक्षतेखाली सदर अधिनियमाबाबत जाणीव व जनजागृती होण्यासाठी तसेच जातीय सलोखा वृध्दीगत होण्यासाठी तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळेस श्री. नानासाहेब आगळे तहसिलदार जामनेर, श्री. मुरलीधर कासार पोलीस निरीक्षक जामनेर, श्री. सचिन सानप पोलीस निरीक्षक पहुर, श्री. रियाज शेख पोलीस उपनिरीक्षक फत्तेपुर, गट विकास अधिकारी पंचायत समिती जामनेर, तसेच उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती मधील अशासकीय सदस्य श्री.विलास गुलाब सोनवणे रा. ममुराबाद ता. जळगाव, श्री. गजानन विश्वनाथ सोनवणे रा नांदगांव ता. जळगाव श्री. सिध्दार्थ दगडु सोनवणे रा. कानळदा ता. जळगांव श्री. प्रविण ज्ञानेश्वर आवागळे रा. म्हसावद ता. जळगांव श्री. मिलींद चांगो सोनवणे रा. गौतम नगर जळगांव, श्री. अनिल सुरेश अडकमोल रा. रायसोनी नगर जळगांव , श्री. प्रताप भिमराव बनसोडे रा. समता नगर जळगाव हे सदस्य तसेच जामनेर तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, सर्व ग्राम महसूल अधिकारी, सर्व महसूल सेवक व सर्व पोलीस पाटील हजर होते.
कार्यशाळेचे प्रस्ताविक मा. श्री. नानासाहेब आगळे तहसिलदार जामनेर यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक मा.श्री.विनय गोसावी, उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांनी कळविले प्रमाणे संपुर्ण महाराष्ट्रात कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत अशी माहिती देवून सदर कायदयाची पार्श्वभुमी स्पष्ट करतांना घटनेच्या कलम 21 नुसार सर्व भारतीयांना जिवीत व व्यक्ति स्वातंत्र्य यांचे संरक्षण दिले आहे. तर घटनेच्या 17 व्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्याचे नमुद आहे. संविधानानुसार धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरुन भेदभाव करण्यास मनाई केलेली आहे. भारताच्या राज्यघटनेत मुलभुत हक्क या शीर्षाखाली समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुध्द हक्क ही कलमे भारतीय राज्यघटनेनुसार संरक्षण प्रदान करित असल्याचे सांगितले.
मार्गदर्शन करतांना अध्यक्षांनी, अॅट्रोसिटी अॅक्ट हा भारताच्या संसदेने 1989 मध्ये पारित केलेला कायदा आहे. या कादयाअंतर्गत गुन्हा ठरविण्यात आलेली कृत्ये, 2016 च्या सुधारणेमुळे कायदयात झालेले बदल इ.बाबत सविस्तर माहिती दिली. अनुसुचित जाती, जमातीच्या पीडीत व्यक्तीची तक्रार प्राप्त होताच त्याची ग्रामपातळीवरील पोलीस पाटील, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक यांनी निःपक्षपणे चौकशी केली पाहीजे. तक्रारीच्या अनुषंगाने साक्षीदारांसह पंचनामा केला पाहीजे. गुन्हा नोंद झाल्यावर सबळ पुराव्यांसह पोलीसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल करावे. कलम 14 अन्वये विशेष न्यायालयाची स्थापना, कलम 18 बाबत माहिती देण्यात आली. गुन्हा नोंद झाल्यापासुन 60 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करणे बंधनकारक आहे. कायदयाच्या अंमलबजावणीत महसूल विभागाची महत्वाची भुमिका असल्याचे सांगितले. तक्रार दाखल करणाऱ्या पीडीत व्यक्तीस जातीचा दाखला सात दिवसाचे आत उपलब्ध करुन दयावा. सामाजिक न्याय विभागाने पिडीत व्यक्तीस आर्थिक मदत करावी, पिडीत व्यक्तीचे व त्याच्या कुटुबाचे पुनर्वसन करावे, पिडीत व्यक्तीस वा कुटुंबास 24 तासांच्या आत भेट दयावी. समितीची रचनेबाबत मा. अध्यक्षांनी माहिती दिली. तसेच आर्थिक व सामाजिक बहिष्कार याचा अर्थ याबाबत माहिती दिली. या कायदया अंतर्गत गुन्हयांची नावे व पीडीत व्यक्तीस सहाय्य म्हणून द्यावयाच्या रकमेची मानके याबाबत माहिती देण्यात आली. गुन्हयांबाबत कलम 1 ते 37 बाबत माहिती मा. अध्यक्षांनी दिली. तसेच 2/3 महिन्यातुन एकदा सदर अधिनियमा अंतर्गत प्राप्त तक्रारींचा आढावा घेणेकामी तालुकास्तरीय बैठक आयोजित करण्यात येईल.
याप्रसंगी कार्यशाळा मार्गदर्शनानंतर चिंचोली पिंप्रीचे पोलीस पाटील श्री. वसंत लोखंडे यांनी अशा कार्यशाळेमुळे कायदयाचे ज्ञान सर्व सामान्य नागरीक व ग्राम पातळीवरील प्रशासनाच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना होईल, असे मनोगत व्यक्त केले. तसेच श्री. गुलाब विश्वनाथ सोनवणे अशासकीय सदस्य यांनी ही कार्यशाळा प्रशंसनिय असल्याचे सांगुन अशा कार्यशाळा नेहमी आयोजित कराव्यात, त्यामधुन जागरुगकता निर्माण होवून समाजातील जातीभेदाची भावना नष्ट होण्यास मदत होईल असे मनोगत व्यक्त केले.
सभेचे आभार प्रदर्शन मा. तहसिलदार श्री. नानासाहेब आगळे यांनी केले व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यशाळेची सांगता करण्यात आली.