जामनेर पंचायत समिती येथे नऊ हजार आठशे वीस लाभार्थ्यांना प्रधानमंत्री घरकुल आवास योंजनेचा लाभ...।
जामनेर पंचायत समिती येथे नऊ हजार आठशे वीस लाभार्थ्यांना प्रधानमंत्री घरकुल आवास योंजनेचा लाभ...।
टाकळी खूर्द गावातील लोक नियुक्त सरपंचाच्या प्रयत्नांमुळे बावन्न घरकूल लाभार्थं्यांना मिळवून दिला लाभ //लाभार्थ्यांमध्ये प्रसन्नता.।
मुख्य संपादक/शांताराम झाल्टे जामनेर
प्रधानमंत्री घरकुल टप्पा क्रमांक दोन मध्ये देशात एकूण वीस लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे आदेश देण्यात आले असून त्या माध्यमातून जामनेर तालुक्यातील पंचायत समिती मार्फत 9820 प्रधान मंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले।
यावेळी एकूण सात हजार सातसे चवळेचाळीस लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता पंधरा हजार रुपये जमा करण्यात आला व लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात टाकळी खूर्द गावातील लोक नियुक्त सरपंच जितेंद्र माळी यांच्या प्रयत्नांमुळे यश प्राप्त झाल्याने आज रोजी एकूण बावन्न घरकूल लाभार्थं्यांना लाभ मिळाला असून टाकळी खूर्द येथील नागरिकांनी लोक नियुक्त सरपंच जितेंद्र माळी यांचे यावेळी कौतूक केले व त्यांचे अभिनंदन जामनेर पंचायत समिति येथे करण्यात आले।
या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एक लाख 46 हजार रुपये लाभ मिळाला आहे घरकुल योजना टप्पा क्रमांक दोन चे पहिला हप्ता आज लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे त्यामुळे तात्काळ लाभार्थी यांनी घरकुल बांधकामाचे सुरुवात करावे असे आव्हानबांधकाम अभियंता जे.के.चव्हाण यांनी यावेळी केले.
मंजुरी वाटप कर्तेवेळी बांधकाम अभियंता जे.के. चव्हाण ,माजी उपसभापती नवल राजपूत,माजी पंचायत समिती सदस्य अमर पाटील,रमण चौधरी गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे,विस्तार अधिकारी अशोक पालवे,लोक नियुक्त सरपंच जितेंद्र माळी,माजी सरपंच कमलाकर पाटील तुकाराम निकम शांताराम बिलोरे धनराज मोरे आनंदा लावरे यांच्यासह पंचायत समिती पदाधिकारी उपस्थित होते .।