त्रिशरण , पंचशीलच्या आचरणातून आदर्श माणूस निर्माण होतो : जयसिंग वाघ

त्रिशरण , पंचशीलच्या आचरणातून आदर्श माणूस निर्माण होतो : जयसिंग वाघ 
:::::::::::::;;:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

मुख्य संपादक शांताराम झाल्टे 
जळगाव :- भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेले त्रिशरण, पंचशील ही तत्वे दैनंदिन जीवनात आचरणात आणली तर माणूस एक आदर्श माणूस घडू शकतो असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.
       सारनाथ बहुउद्येशिय संस्था , जळगाव तर्फे वाघ नगर येथील बुद्ध विहारात आयोजित  ' पौर्णिमा वंदनेची ' या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
        जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आज माणूस व्यसनाधीन होत आहे , द्वेष , आकस, मत्सर त्याचेत वाढत असल्याने तो भरकटत आहे अश्या प्रसंगी त्याने बुद्ध , धम्म , संघ याची विचारधारा , कार्यप्रणाली समजून घेऊन , हिंसा , चोरी, व्यभिचार करणार नाही , खोटे बोलणार नाही , दारू पिणार नाही अशी शपथ घेतली तर तो नक्की आदर्श जीवन जगू शकेल .
        जनक्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे हे अध्यक्षस्थानी होते . त्यांनी माणसाने माणसाशी माणसा सारखे वागले तर नवा समाज घडू शकेल जो गौतम बुद्ध यांना अभिप्रेत होता . 
          ईश्वर वाघ यांनी आपल्या मनोगतात  देश विदेशातील बौद्ध धर्मीय जनतेची जीवन प्रणाली कशी आहे याची माहिती दिली . त्यांनी जळगाव तेथे शुक्रवारी येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रेत जनतेने मोठ्यासाख्येने सामील होण्याचे आवाहन केले .
         मायाबाई अहिरे यांनी विहाराबद्दल माहिती देवून येथे रोज सायंकाळी सहा वाजता बुद्ध वंदना घेतली जाते , पौर्णिमेच्या दिवशी आजपासून विशेष कार्यक्रम घेण्यात येईल असे सांगितले .
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव सोनवणे , प्रास्ताविक पितांबर अहिरे , स्वागत किरणचंद्र आखाडे तर आभारप्रदर्शन विलास सुरवाडे यांनी केले .
        लक्ष्मीबाई सोनवणे , चारूबाई सुरवाडे , आशाबाई बोदोडे, जनाबाई केदार , विलास सुरवाडे , राहुल अहिरे , बबिता वाघ , बुद्धरत्न वाघ , राजू सोनवणे, करुणा खरे , शांताबाई सपकाळे , सी. आर. सोंदवले, शालुबाई सुरवाडे , करुणाबाई सपकाळे यांच्यासह बहुसंख्य स्त्री - पुरुष हजर होते 

सुरवातीस भगवान बुद्ध , डॉ. बाबासाहेब आंबेडकर , रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले .
कार्यक्रमानंतर सर्वांनी ध्यान धारणा केली .

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।