केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत गांधीनगर (गुजरात) येथे आयोजित असलेले "बिमस्टेक युवा शिखर परिषदेचा" कार्यक्रम संपन्न...।
केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत गांधीनगर (गुजरात) येथे आयोजित असलेले "बिमस्टेक युवा शिखर परिषदेचा" कार्यक्रम संपन्न...।
मुख्य संपादक/शांताराम झाल्टे
गुजरात मधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे "बिमस्टेक युवा शिखर परिषद" चे आज उद्घाटन झाले, यावेळी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया, मुख्यमंत्री श्री.भूपेंद्रजी पटेल व केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे हे प्रमूख उपस्थितीत होते.
BIMSTEC ही बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूच्या देशांमधील विविध क्षेत्रात परस्पर सहभाग प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली संघटना आहे.
भारतातील बिमस्टेकची पहिली शिखर परिषद गुजरातमध्ये आयोजित करण्यात आली असून, यावेळी विविध देशांतील तरुण प्रतिनिधींचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी गुजरातच्या मातीत स्वागत केले.
माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जी यांनी विकसित भारताच्या उभारणीत तरुणांना महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून वर्णन केले आहे आणि कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 1 लाख तरुणांना राजकारणात आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. युवा सक्षमीकरणासाठी भारताच्या या विविध उपक्रमांचे इतर BIMSTEC देशांनीही पालन करावे असे यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी मत मांडले.
विविध देशांतील तरुणांना एका व्यासपीठावर एकत्र येण्यासाठी आणि परस्पर विकासाचा विचार करण्यासाठी, त्यांच्या देशांच्या सर्वोत्तम पद्धती देवाणघेवाण करण्यासाठी हे नियोजन अतिशय उपयुक्त असून, शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) साध्य करण्यासाठी BIMSTEC सदस्य देशांच्या युवा शक्तीचा उपयोग करण्यासाठी ही शिखर परिषद उपयुक्त ठरणार आहे.