टाकळी खुर्द गावातील लोक नियुक्त सरपंच जितेंद्र माळी यांच्या अध्यक्षतेखाली सौ.मिनाक्षी मोरे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड.

टाकळी खुर्द गावातील लोक नियुक्त सरपंच जितेंद्र माळी यांच्या अध्यक्षतेखाली सौ.मिनाक्षी मोरे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड.

फटाक्याच्या आतिषबाजीने व जल्लोषाने सौ.मीनाक्षी मोरे यांची उपसरपंच पदी स्वागत.।

जामनेर/प्रतिनिधी-शांताराम झाल्टे

जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द येथे नुकतीच उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली आहे या निवडणूकीत निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक गणेश घ्यार यांनी कार्य पार पाडले निवडणूक अर्जावेळी सौ.मीनाक्षी शरद मोरे यांचा एकमेव अर्ज आला असता  ग्रामपंचायत च्या सभेचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच जितेंद्र प्रल्हाद माळी यांनी सौ.मीनाक्षी शरद मोरे यांना आज रोजी उपसरपंचपदी बिनविरोध घोषित केले आहे.।
या निवडणुक ठिकाणी सभेचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच जितेंद्र माळी ,माजी उपसरपंच विजय चवरे, ग्रामपंचायत सदस्य उमेश पाटील,अमोल महाजन,सौ सुरेखा रमेश महाजन,नम्रता दीपक बावस्कर परिवर्तन पॅनलचे ज्येष्ठ कार्यकर्ते गुरुवर्य रमेश चवरे सर, सुनील जंजाळ सर ,विनोद माळी,आनंद महाजन,अनदा सोन्ने,सीताराम नेरकर,युवराज मोरे व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.। 

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।