केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक संपन्न...।

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या अध्यक्षतेखाली 
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक संपन्न...।
मुख्य संपादक/ शांताराम झाल्टे 

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक आज रोजी जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यलय जळगांव येथे आयोजित करण्यात आली .
सदर बैठकीस अध्यक्ष म्हणून केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी वस्त्रोद्योग मंत्री मा.श्री.संजयजी सावकारे ,सहअध्यक्ष खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीत राहून विविध विषयांवर चर्चा याठिकाणी करण्यात आली।

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचेमार्फत विकासात्मक कामे लवकर पूर्ण करून नागरिकांना प्रत्येक योजनेचा तत्काळ लाभ मिळवून द्यावा असे निर्देश देण्यात आले, तसेच केंद्र सरकार पुरस्कृत योजना- प्रधानमंत्री पिक विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मध्यान्ह पोषण आहार योजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजना, अमृत योजना, रोजगार हमी, दीनदयाल विद्युतीकरण योजना, मूलभूत सुविधा प्रकल्प, डिजिटल इंडिया योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, स्वच्छ भारत योजना, उज्वल अशुरंस योजना, सर्वशिक्षा योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, राष्ट्रीय भूमी अभिलेख यासारख्या विविध केंद्र सरकार पुरुस्कुत योजनांसह दूरसंचार, महामार्ग, रेल्वे, खनिकर्म यासारख्या विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊन जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला.
 या बैठकी उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह वस्त्रोद्योग मंत्री मा.श्री.संजयजी सावकारे सहअध्यक्ष खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार श्री.सुरेश (राजूमामा) भोळे, आमदार श्री.चंद्रकांत सोनवणे, आमदार श्री.अमोल चिमणराव पाटील, जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, मनपा आयुक्त श्री.ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री.अशोक नखाते तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आदि पदाधिकारी संबंधित अधिकारी वर्ग  होते.।

Comments

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।