अनधिकृतपणे जाहिरात बॅनर लावणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याच्या गिरीश महाजन यांच्या सूचना.।

अनधिकृतपणे जाहिरात बॅनर लावणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याच्या गिरीश महाजन यांच्या सूचना.।

मुख्य संपादक शांताराम झाल्टे 
जामनेर शहरात लागलेल्या अनधिकृत होर्डिंग ्स आणि जाहिरात फलकांवर त्वरित कारवाई करण्यात याव्या अशा सूचना मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना दिल्या आहेत. 

जामनेर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील पथदिव्यांवर त्याचबरोबर प्रत्येक चौकात अनधिकृत पणे जाहिरात आणि होर्डिंग लावलेले आहेत. ज्यामुळे शहराच्या विद्रूपीकरणात भर पडत आहे. त्याचबरोबर परवानगी नसताना देखील शहरातील पतदिव्यांवर शुभेच्छांचे बॅनर लागलेले आहेत. तसेच शहरातील अनेक चौकात नगरपालिकेची परवानगी न घेता मोठमोठे बॅनर लागलेले आहेत. अनेकदा  नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही कोणतीही कारवाई होत नसल्याची ओरड स्थानिकांनी केली होती. या संदर्भात आज पत्रकार मोहन दुबे आणि पत्रकार सागर लव्हाळे यांनी मंत्री गिरीश महाजन यांना शहरातील अनधिकृत पणे लावण्यात आलेल्या जाहिरात बाजी बद्दल माहिती दिली. यानंतर लागलीच गिरीश महाजन यांनी नगरपालिकेचे सीईओ बागुल यांना फोनवरून कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर शहरातील चौकात फक्त महापुरुषांचे बॅनर किंवा पोस्टर लागले पाहिजे , कुणाच्याही शुभेच्छांचे किंवा वाढदिवसाचे बॅनर अनधिकृतपणे कुठेही लागता कामा नये असे देखील गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता जामनेर शहरात अनधिकृतपणे जाहिरात करणाऱ्यांवर जामनेर नगरपालिका कारवाई कधी करणार असा स्थानिकांचा प्रश्न आहे.

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।