महत्वाकांक्षा व जिद्दीने मेंढपाळाची लेक झाली पो. उपनिरीक्षक.
मुख्य संपादक शांताराम झाल्टे
सर्वात कठीण परीक्षा आहे ती एम. पी. एस. सी. किंवा कुठलीही अन्य परीक्षा पण जिद्द व शिकुन पुढे जाण्याची महत्वाकांक्षा तसेच आवड व मेहनत करण्याची तयारी असेल तर कुठलीच परीक्षा कठीण नसते. वडील एक सामान्य मेंढपाळ असलेल्या एका लेकीने सिद्ध करुन दाखवले आहे.जालना जिल्ह्य़ातील भोकरदन तालुक्यात असलेल्या जळगाव सपकाळ येथील हालाकीची परीस्थितीतील लता सुरेश सावळे हिने प्रचंड मेहनत घेऊन एम. पी. एस. सी. ची परीक्षा दिली व तिला तिच्या मेहनतीचे फळ मिळाले आणी परीक्षा उत्तीर्ण झाली असून एका साधारण कुटुंबातील लता आता पोलीस उपनिरीक्षक झाली . त्यामुळे जळगाव सपकाळ गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लताच्या माध्यमातून रोवला आहे.
लता सुरेश सावळे हिने नाशिक येथून पी. एस. आय चे प्रशिक्षण पूर्ण करून गावाला भेट दिली असता त्यानिमित्त गाव गावकऱ्यांच्या व समाजाच्या वतीने तिचा नागरि सत्कार करण्यात आला. लता सुरेश सावळे तिचे वडील शेती करून जोडधंदा म्हणून मेंढी पालन करतात तशी घरची परिस्थिती हालाखीची असतानाही आपली मुलगी आणि मुलगा शिक्षणापासून वंचित न ठेवता त्यांनी तिला शिक्षण देण्याचे काम केले लता हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा जळगाव आणि ८ वी ते १२ पर्यंतचे शिक्षण तिने विनय माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी झाले. आपल्याला काहीतरी करून दाखवायचं त्या उद्देशाने तिने पुढील पदवीचे शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन २०२३ चे मुख्य परीक्षेत तिला यश मिळाले. तिने नाशिक येथे आपले प्रशिक्षण पूर्ण केले आणि तिची पहिली पोस्टिंग मुंबई शहरात झाली. त्यानिमित्त गावकऱ्यांच्या वतीने आणि समाजाच्या वतीने तिचा नागरिक सत्कार करण्यात आला.
तसेच नवनिर्वाचित पोलीस उपनिरीक्षक लता सुरेश सावळे हि जामनेर पुरा येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते रवि वाघ यांची नातेवाईक असुन त्यांनी सुद्धा पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.