अमळनेर येथे लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पथरस्त्यांची दुरावस्था--जयराम कोळी,सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता यांची वरिष्ठान कडे तक्रार ..।
अमळनेर प्रतिनिधी
ढेकू रोड अंमळनेर येथे लाखो रुपये खर्च करून दुतर्फा वाटसरूंसाठी पथरस्ते व इलेक्ट्रिक पोल उभे करून अमळनेर शहराच्या सौंदर्यामध्ये भर करण्यात आली होती त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉक साठी फिरणाऱ्यांची संख्येत लक्षणीय वाढ होती तसेच संध्याकाळी दिसत असलेल्या विलोभनीय दृश्यांमुळे शहरवासीय फेरफटका मारण्यासाठी तसेच उंच अशा ओट्यासारख्या बांधण्यात आलेल्याजयराम कोळी,सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता यांची वरिष्ठान कडे तक्रार.।
पथरस्त्यांवर बसून आबाल वृद्ध चर्चा करीत असत परंतु गेल्या दोन वर्षापासून काटेरी झाडे झुडपे एवढी वाढलेली आहेत की पथरस्तेच दृष्टीस पडत नाही काटेरी झाडे झुडपे एवढी वाढलेली आहेत की ते मुख्य रस्त्यापर्यंत विस्तारलेली आहेत त्यामुळे वाटसरूंना रस्त्याच्या कडेला जायला सुद्धा जागा नाही आणि रस्त्याने गेले तर सतत वाहनाची भीती असते तर दुसरीकडे काटेरी झाडे जोडपे अत्यंत वाढल्यामुळे इंचू साप यासारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती असते त्यामुळे या ठिकाणी रस्त्यावर छोटे-मोठे अपघात सतत होत असतात आपल्या कार्यालयाच्या लागून असलेल्या रस्त्यावरील पथरस्त्यांची जर का एवढी दुर्दशा असेल तर इतर रस्त्यांची अवस्था काय असा प्रश्न निर्माण होतो कार्यालयासमोर झालेली दुर्दशा जर का कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर व हेमंत महाजन उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अमळनेर यांना दिसत नाही तर ते खरोखर आपल्या कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष जात असतील काय व ते कार्यालयात देखील पूर्णवेळ आढळून येत नाही म्हणजेच घरी बसून मोजमाप पुस्तिका लिहितात काय असे एक ना अनेक प्रश्न ? निर्माण होतात शासकीय कंत्राट दाराशी संबंधित असलेले स्थानीय विकास आमदार व मंत्री अनिल पाटील यांना देखील ही बाब दिसत नाही का? भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचविण्याच्या प्रयत्न करतात अशी शंका कुशंका निर्माण होते.जयराम कोळी,सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता यांची वरिष्ठान कडे तक्रार दाखल.