शिरपुर तालुका पोलीसांनी४०,३२,०००/- रु किंमतीचा महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत तुबाखु गुटखा केला जप्त.।
शिरपुर तालुका पोलीसांनी
४०,३२,०००/- रु किंमतीचा महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत तुबाखु गुटखा केला जप्त.।
शिरपुर तालुका पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी
जामनेर/शांताराम झाल्टे
दि.१५/२०२४ रोजी सकाळी ०५.०० वा.सुमा.पोलीस निरिक्षक श्री. जयपाल हिरे साहेब यांना गुप्त बातमी दारा मार्फत बातमी मिळाली की, एक अशोक लेलॅन्ड कंपनीची माल वाहु ट्रक क्रं. DD-०१-M- ९२४२ हिच्यात मुंबई आग्रा हायवेवरुन सेधवा कडुन धुळे कडेस वर नमुद वाहनात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत तंबाखुजन्य गुटखा वाहतुक होणार आहे सदर वाहनावर कारवाई करा असा आदेश दिल्याने त्यावरुन पोउपनिरी कचरे तसेच ग्रेपोसई शिंदे, पो.कॉ. भुषण पाटील, पो.कॉ. मनोज पाटील यांनी मुंबई आग्रा हायवे क्रं. ०३ हाडाखेड चेकनाक्यावर बातमीप्रमाणे वाहन आढळुन आल्याने सदर वाहन थांबविले असता चालकाने वाहन शिरपुर कडेस पळविले तेव्हा पोलीसांनी सदर वाहनाचा पाठलाग करुन सदरचे वाहन हाडाखेड गावाजवळ सुळे फाटा येथे वाहन थांबविले वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव विकास हरी बदोले वय २५ वर्ष रा.नयानगर कॉलनी, वॉर्ड २० ग्रीड के पास, बालसमुद ता. खसरावद जि. खरगोन राज्य मध्यप्रदेश असे सांगीतले त्यानंतर सदर वाहन पोलीस ठाण्यात आणुन दोन पंचांना बोलावुन त्यांचे समक्ष सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात खालील वर्णनाची महाराष्ट्रात प्रतिबंधीत सुगंधीत तुबाखु जन्य गुटखा मिळुन आला तो.
१४०,३२,०००/- रु किंमतीच्या ३५ पांढ-या रंगाच्या मोठ्या गोण्या प्रत्येक गोणी मध्ये ६ छोटया पांढ-या रंगाच्या
गोण्या प्रत्येक छोट्या गोणी मध्ये ६४ हिरव्या रंगाचे पाऊच त्यावर FOR EXPORT ONLY RCB असे लिहीलेले प्रत्येक पाऊच मध्ये एकुण ६० पिवळया रंगाच्या पुड्या त्यावर FOR EXPORT ONLY RCB असे लिहीलेले त्यामध्ये सुगंधीत तुबाखु जन्य गुटखा असलेली प्रत्येक पुडीची किंमत ५ /- रुपये अंदाजे
२) १०,००,०००/- रु किंमतीची एक अशोक लेलॅन्ड कंपनीची माल वाहु ट्रक क्रं. DD-०१-M-९२४२ .५०,३२,०००/- एकुण
वरील प्रमाणे मुददेमाल हा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असल्याची खात्री झाल्याने वरील मुददेमाल व वाहन ताब्यात घेवुन पुढील योग्य ती कारवाइ होणेकामी मा. सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन धुळे (म.रा.) यांना पत्र देण्यात आले सदर विभागाकडुन सहाय्यक आयुक्त श्री संदिप.देवरे व अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनी पोलीस ठाण्यात येवुन मालाची तपासणी केली असता सदरचा माल हा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असल्याचा त्यांनी अभिप्राय दिल्याने नमुद वाहन चालक यांचे विरुध्द त्यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्यावरुन शिरपूर तालुकाद पोलीस ठाणे गुरनं. २९८/२०२४ भारतीय न्याय सहिता २०२३ चे कलम १२३.२२३.२७४,२७५ सह अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम २६(२) (i), २६ (२) (iv). २७ (२)(d), २७(३) (c). ३(१) (ZZ). (i), ), ३(१) (ZZ), (V) चे उल्लघन कलम ५९(१) प्रमाणे अन्वये दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा तपास पोसई मनोज कचरे हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली पोनि.जयपाल हिरे,पोसई सुनिल वसावे,पो पोसई मनोज कचरे, ग्रेपोसई शिंदे,पो.हवा.राजु हिसले.पोहेकॉ बागुल,पोकॉ मनोज पाटील,पोकॉ भुषण पाटील,पोकॉ मनोज नेरकर,चालक पोकॉ सागर कासार यांनी केली आहे.