राष्ट्रीय अधिवेशनात खान्देशातून जळगाव जिल्ह्याचा नंबर वन राहणार .!-- निर्मल बोरा

राष्ट्रीय अधिवेशनात खान्देशातून जळगाव जिल्ह्याचा नंबर वन राहणार .!-- निर्मल बोरा 
जामनेर शांताराम झाल्टे 
मागील पाच दशकापासून भारतीय जैन संघटनेचे कार्य निस्वार्थपणे सुरू आहे समाजाच्या व देश हिताच्या कामात नेहमी अग्रेसर असते.या संघटनेत पदासाठी कोणाचीही चडाओड नसते काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला हळूहळू पद मिळत असते. पदाविना या संघटनेत सर्व कार्यकर्ते संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मूथ्था यांच्या संकल्पनेतून तयार केलेले काम चाकोरिबद्द काम करत असतात आज कोणतेही सरकारी अनुदान न घेता ही संघटना प्रत्येक क्षेत्रात काम करत असते. संघटनेने पाणी फाऊंडेशन, मूल्यवर्धन शिक्षण पध्दत,उच्च शिक्षत वधू-वर मेळावा,स्मार्ट गर्ल,बिजनेस डेव्हलपमेंट, आपदकालीन सेवा असे हजारो कार्यक्रम राबवत असते. डिजिटल युगात संघटनाने कसे काम कारावे.यासाठी पुण्यात राष्ट्रीय अधिवेशन दि.30 नोव्हेंबर 1 डिसेंबर या दोन दिवसीय आदिवेशात खान्देशातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असून खान्देशातून जळगाव जिल्ह्यातून सर्वाधिक कार्यकर्ते उपस्थित असा विश्वास नूतन जिल्हाअध्यक्ष निर्मल बोरा यांनी व्यक्त केले. जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अध्यक्षाशी आमचा संपर्क सुरू आहे. या कार्यासाठी राज्य कार्यकारणी सदस्य व जिल्ह्यातील संघटनेचे जेष्ठ विनय पारख, व अशोक श्रीश्रीमाळ यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवराचे मार्गदर्शन लाभणार आहे. याबाबत नूतन अध्यक्ष निर्मल बोरा, जिल्हा सचिव दर्शन देशलहरा हे नियोजन करीत आहे.

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।