जामनेर शहरात पोलिस ठाण्यासमोरून मनीष शर्मा यांची बुलेट मोटरसायकलची चोरी! चोरांचे पोलीसांना खुल्ले आव्हान...?
जामनेर शहरात पोलिस ठाण्यासमोरून मनीष शर्मा यांची बुलेट मोटरसायकलची चोरी! चोरांचे पोलीसांना खुल्ले आव्हान...?
जामनेरात चोरीच्या प्रमाणात वाढ.।
जामनेर/शांताराम झाल्टे
जामनेर: जामनेर शहरात मोटरसायकल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातील सर्वात धक्कादायक घटना 11 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली. भुसावळ रोड पोलीस स्टेशनसमोरून मनीष किसन शर्मा यांच्या घरासमोर उभी असलेली बुलेट मोटरसायकल (MH-19, BY-4161) अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे.
घटनेचे तपशील:
मनीष शर्मा हे नेहमीप्रमाणे जळगाव रोडवरील आपले दुकान बंद करून रात्री उशिरा घरी आले. त्यांनी बुलेट मोटरसायकल घराजवळ पार्क केली. मात्र, काही वेळानंतर गाडी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने आसपासच्या परिसरात शोध घेतला, परंतु गाडीचा थांगपत्ता लागला नाही. यानंतर त्यांनी जामनेर पोलीस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार नोंदवली.
पोलीस ठाण्यासमोर चोरीची घटना धक्कादायक
ही घटना जामनेर पोलीस ठाण्यासमोर घडल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील नागरिकांमध्ये या घटनेबद्दल संतापाचे वातावरण आहे. दिवसाढवळ्या पोलिस ठाण्याजवळून वाहन चोरी होत असेल, तर सामान्य नागरिकांची सुरक्षा कशी राहील, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
गाडी आढळल्यास संपर्क करा: मनिष शर्मा
गाडीची माहिती मिळाल्यास किंवा ती कुठे दिसल्यास 9579367696 या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या व्यक्तीस योग्य बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा मनीष शर्मा यांनी केली आहे.
शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रणाची मागणी
जामनेरमध्ये वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
Comments
Post a Comment