डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात 200विद्यार्थ्यांनीॅ कॅडेव्हरीक ओथ अर्थात शवविच्छेदनापूर्वीची घेतली शपथ...।

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात 200 विद्यार्थ्यांनी कॅडेव्हरीक ओथ अर्थात शवविच्छेदनापूर्वीची घेतली शपथ...।

शांताराम झाल्टे जामनेर 

जळगाव - येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात कॅडेव्हरीक ओथ अर्थात शवविच्छेदनापूर्वीची शपथ घेण्यात आली. यावेळी 200 विद्यार्थ्यांनी ही शपथ ग्रहण केली.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना डॉ. पूनम यांनी शवविच्छेदनापूर्वीची शपथ दिली. यावेळी 200 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. 

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्येक 10 विद्यार्थ्यांसाठी एक शव अभ्यासासाठी उपलब्ध करून दिले जाते. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना अशी सुविधा उपलब्ध करून देणारे हे एकमेव महाविद्यालय आहे. 
यावेळी विभागप्रमुख डॉ. अमृत महाजन, डॉ. शुभांगी घुले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
 याप्रसंगी डॉ. तुषार पाटील, डॉ. जमीर, डॉ. पूनम, डॉ. प्रिती साळुंके, डॉ. रघुराज यादव यांच्यासह कर्मचारी गजानन जाधव, गोपाल नांदुरकर, रोशन महाजन, राजू धांडे, गुणवंत  कोल्हे आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।