धरणगाव शहरात क्रांतिसुर्य महात्मा जोतिराव फुले नावाने प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा.!

जामनेर/शांताराम झाल्टे 

प्रवेशद्वाराला दिलेले नाव धरणगांव शहरासाठी अभिमानास्पद - (पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य ) नामदार गुलाबराव पाटील 

धरणगांव प्रतिनिधी - पी डी पाटील सर

धरणगांव - शहरातील एरंडोल रस्त्याला धरणगाव शहरांमध्ये प्रवेश करीत असतांना महात्मा फुले नगर एरंडोल रोड येथे "भव्य प्रवेशद्वार " उभारण्यात आले या प्रवेशद्वाराला आधुनिक भारताचे शिल्पकार, शिक्षणतज्ञ, थोर समाज सुधारक, सत्यशोधक, तात्यासाहेब यांचे नाव " क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले प्रवेशद्वार " देण्यात आले. या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन फीत कापुन महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
         याप्रसंगी मोठा माळीवाडा समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन, लहान माळीवाडा समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन व समस्त पंच मंडळ तसेच शहरातील विविध समाजाचे समाज अध्यक्ष व पंचमंडळ, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रातील पदाधिकारी तसेच शहरातील सर्वच समाज बांधव मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही टी माळी यांनी तर आभार सचिव गोपाल माळी यांनी मानले.

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।