पाचोरा भडगांव मतदार संघाचे अमोलभाऊ शिंदे यांना ‘लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ खान्देश’ पुरस्काराने सन्मानित...।
पाचोरा भडगांव मतदार संघाचे अमोलभाऊ शिंदे यांना ‘लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ खान्देश’ पुरस्काराने सन्मानित...।
पाचोरा : पाचोरा व भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख व युवा नेते अमोल शिंदे यांना लोकमततर्फे “लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ खान्देश” पुरस्काराने दि.०३ वार गुरूवार रोजी कोल्हे हिल्स येथील समारंभात ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन,पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अमोल शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.।
या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित व्यासपीठावर खासदार श्रीमती स्मिताताई वाघ,धुळे येथील आमदार अमरीश भाई पटेल, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, लोकमतचे संपादक किरण अग्रवाल होते.
यावेळी कार्यक्रमाचे औचित्य साधुन खान्देशातील पुरस्कारार्थी नेतृत्वाचा प्रोफाइल असलेले कॉफी टेबल बुक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. खानदेशातील राजकारण आणि समाजकारणात क्रियाशील असलेल्या गुणवंत नेतृत्वांचा सन्मान या सोहळ्याच्या निमित्ताने झाला.
लोकमतचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. अपूर्वा वाणी यांनी सूत्रसंचालन केले. लोकमतचे महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी आभार मानले. हा पुरस्कार स्वीकारताना अमोल शिंदे यांचे समवेत भडगाव तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील, पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल बापू पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप बापू पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते।