महाराष्ट्र शासनाच्या निष्काळजी पणा मुळे कंत्राटदारांचे झालेल्या कांमाचे राज्यातील विकासाची ४० हजार कोटींची बिले मिळत नसल्याने कंत्राटदारांमध्ये नाराजी...।
जामनेर/शांताराम झाल्टे
बांधकाम विभाग व इतर शासनातील विभागातील शासनाची विकास कामे झालेल्या कंत्राटदार यांचे देयेके बिल पास होत नसल्याने राज्यातील सर्व कामे बंद...।
राज्यातील Budget Distribution system ( BDS)ऐन दिपावली मध्येच गेल्या पाच दिवसापासून बंद
अत्यंत धक्कादायक गेल्या पंचवीस वर्षात कधीच घडले नाही असा प्रकार राज्यातील Budget Distribution system ( BDS)ऐन दिपावली मध्येच गेल्या पाच दिवसापासून बंद
राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर शासनातील विभागाकडील शासनाची विकासाची कामे केलेल्या कंत्राटदार यांचे देयेके (Bill) देणे, तसेच शासकीय कार्यालये ची पाणीपट्टी, वीजपुरवठा, व इतर अनेक बिल ज्या माध्यमातून इतरांना देणे असते, तसेच कंत्राटदार यांचे गेल्या अनेक वर्षापासून पुर्ण केलेल्या कामांचे अनामत रक्कम ( Security Deposit) जे शासनाकडे अनेक वर्षापासून पडुन असते ते देण्याचे हे एक माध्यम, म्हणजे च BDS system हीच सिस्टीम ऐन दिपावली सारख्या मोठ्या सणावेळीच गेल्या पाच दिवसापासून बंद ठेवल्याने राज्यातील आर्थिक परीस्थिती किती गंभीर आहे याची प्रचिती सगळ्या विकासकाला व जनतेला येत आहे.
महाराष्ट्र शासन तर कंत्राटदार यांनी केलेल्या कामांचे राज्यातील विकासाची ४० हजार कोटींची बिले स्थगित असल्याने कंत्राटदारांची नाराजी केली जात आहे।
त्यामध्ये आता कहर झाला आहे की दिवाळीच्या आधीच बिल मिळत नसल्याने आता विकासक व कंत्राटदार यांनी दिवाळी पूर्वी मागील दोन चार वर्षात पुर्ण केलेल्या कामांची अनामत रक्कम Security Deposit जी शासनाकडे पडुन असते ती काढून तर दिवाळी साजरी करावी असा हेतू यामागे आहे, ती रक्कम कंत्राटदार अर्ज दाखल केल्याबरोबर सगळी छाननी करून एका दिवसात शासनाने कंत्राटदार यांच्या खाते वर जमा करणे आवश्यक असते ती BDS प्रणाली सुद्धा पाच दिवसापासून बंद आहे.
याचाच अर्थ हा कंत्राटदार यांन केलेले कामाचे पैसे नाही, पुर्वीचे अनामत रक्कम देऊ शकत नाही, शासनाचे दैनंदिन लाईट, फोन, पाणी पुरवठा व इतर अनेक बिल देऊ शकत नाही...महत्त्वाचे हा भाग यामध्ये आहे की कोणत्याही प्रकारची जबाबदारी प्रशासन व उच्च आधिकारी उचलण्याची शक्यता कमीच आहे, ते उत्तर देऊ शकत नाही, ज्यांनी हा विचित्र उद्योग केला आहे त्यांना विचारा,,दुसऱ्यांची बला आम्ही कशाला अंगावर घेऊ अशी मानसिकता त्यांनी आचरणात आणली आहे.
ह्या गंभीर धक्कादयक राज्याच्या आर्थिक बाबींवर आता प्रसार माध्यमे व जनतेनीच आवाज उठविला पाहिजे यासाठी लोकशाही च्या पवित्र अशा निवडणूकीच्या काळात *येत्या बुधवार दि ६ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वा राज्यातील सर्व विकासक, कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजुर संस्था, विकासक,यांची ONLINE बैठक होईल।
यामध्ये योग्य निर्णय घेतला जाईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता पदाधिकारी यांनी दिली आहे.