जळगांव येथे सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न !..
जळगाव जिल्ह्याची नूतन कार्यकारिणीची एकमताने निवड !...
जामनेर/शांताराम झाल्टे
जळगाव पूर्व विभाग जिल्हाध्यक्षपदी रविंद्र तितरे, पश्चिम विभाग जिल्हाध्यक्षपदी पी.डी.पाटील तर जिल्हा समन्वयक पदी विजय लुल्हे यांची निवड !...
प्रत्येक तालुक्यात व गावा - गावात सत्यशोधक समाज संघाच्या कार्यकारिणी निर्माण करून सत्यशोधक समाजाचा प्रचार करा - अरविंद खैरनार ( अध्यक्ष )
सत्यशोधक समाज निर्माण करणे ही काळाची गरज - विश्वासराव पाटील ( विश्वस्त )
धरणगांव - दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ रोजी सत्यशोधक समाज संघाची जिल्हा सहविचार सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरविंद खैरनार ( सत्यशोधक समाज संघ,महाराष्ट्र राज्याध्यक्ष ) होते. प्रमुख अतिथी सचिव डॉ.सुरेश झाल्टे , विश्वस्त विश्वासराव पाटील, विधीकर्ते भगवान रोकडे उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलेसभेस उपस्थित ज्या - ज्या परिवाराने सत्यशोधक पद्धतीने विधी केले अशा सर्व एरंडोल, धरणगाव, चाळीसगाव, जळगाव, जामनेर तालुक्यातील परिवारांचा ग्रंथ व शाल देऊन प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला.
सत्यशोधक समाज संघाचे विश्वस्त विश्वासराव पाटील यांनी सत्यशोधक समाज संघाची भूमिका स्पष्ट केली. सत्यशोधक समाज संघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अरविंद खैरनार यांनी अहिल्यानगर येथे होत असलेल्या ४२ वे राज्य अधिवेशन या संदर्भात विस्तृत माहिती सांगितली व संघटनेचे कार्य तथा महत्त्व विशद करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षांच्या परवानगीने जळगाव जिल्ह्याची नूतन कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यात येऊन पदनिहाय पुढील प्रमाणे घोषित करण्यात आली.
पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष - रवींद्र तितरे ( जळगांव ), उपाध्यक्ष - जयराम चौधरी, निवेदिता ताठे ( जळगाव ), कार्याध्यक्ष - सुरेश सपकाळ ( जळगाव ), सचिव - रमेश वराडे ( जामनेर ),कोषाध्यक्ष - योगेश कोलते ( जळगाव ) , संयोजक - अशोक सोनवणे ( जळगांव ) ,संघटक - कैलास महाजन, सहसचिव - पवन माळी, जळगाव जिल्हा विधीकर्ते प्रभारी शिवदास महाजन ( एरंडोल ) यांची एकमताने निवड करण्यात आली.
पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष - पी.डी. पाटील ( धरणगाव ), कार्याध्यक्ष - कैलास जाधव ( पातोंडे ),उपाध्यक्ष - प्रल्हाद महाजन (एरंडोल ), अनिल माळी ( चाळीसगाव ), विठ्ठल नामदास ( अमळनेर ), (चाळीसगाव ), सचिव - कविराज पाटील (एरंडोल ), कोषाध्यक्ष - हेमंत माळी (धरणगाव ), जिल्हा समन्वयक - विजय लुल्हे ( जळगाव ),संयोजक - संतोष महाजन ( पारोळा ),संघटक सुशील माळी ( भडगाव ),सहसचिव - दगडू उत्तम पाटील ( मांदुर्णे ), हिम्मत महाजन ( भडगाव ), लक्ष्मणराव पाटील ( धरणगाव ) यांची एकमताने निवड करण्यात आली.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, सचिव व विश्वस्त यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.डी.पाटील तर आभार योगेश कोलते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय लुल्हे, रवींद्र तितरे, पी डी पाटील, भगवान बोरसे, कवीराज पाटील, दीपक राजपूत, योगेश कोलते यांनी परिश्रम घेतले.