शेकडो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश, डॉ.सागर गरुड यांनी घेतला पुढाकार...
जामनेर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची सुरुवात आज शेंदुर्णी येथे पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, ज्यामुळे या मतदारसंघात भाजपचे बळ आणखी वाढले आहे.
काही महिन्यांपूर्वी शेंदुर्णीतील ज्येष्ठ नेते मा. श्री. संजयदादा गरुड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वांचे लक्ष डॉ. सागर गरुड काय भूमिका घेतात, याकडे होते. अखेर, डॉ. सागरदादा गरुड यांनीही भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत "हम साथ-साथ है" हे दाखवून दिले.
या ऐतिहासिक कार्यक्रमात मा. श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते डॉ.सागर गरुड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. या सोहळ्यात गोविंदशेठ अग्रवाल, विलासभाऊ राजपूत, अमृतबापु खलसे, पंडितराव जोहरे यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या वेळी डॉ. सागर गरुड यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले, “आगामी निवडणुकीत गिरीशभाऊंना सर्वाधिक विक्रमी मतांनी निवडून आणू.” या प्रवेशाने जामनेर आणि पाचोरा तालुक्यातील भाजपला नवा उर्जितावस्था मिळाला आहे.