सावित्रीबाई फुले विद्यालयातील विद्यार्थिनींनी पथनाट्यातून मतदार जनजागृती केल्याबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेबांनी केले कौतुक !
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले कौतुक !
'स्वीप ' कार्यक्रमांतर्गत लोकशाहीचा जागर !
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल रविवारी ( ता .२० ) पंचायत समिती जामनेर येथे 'स्वीप ' उपक्रमांतर्गत महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी 'लोकशाहीची दिंडी ' हे मतदान जनजागृती पथनाट्य सादर केले .
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांनीचे रोख पारितोषिक देऊन कौतुक केले . यात इ . ९ वीतील हर्षदा अनिल क्षीरसागर , प्रणिता समाधान क्षीरसागर ,मुनिराबी खलील शेख , गायत्री दीपक जवखेडे , कल्याणी गणेश धनगर , माहेश्वरी संजय धनगर , गायत्री योगेश पवार या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला . त्यांना शाळेचे सांस्कृतिक प्रतिनिधी शंकर भामेरे यांचे मार्गदर्शन लाभले .याप्रसंगी तहसीलदार नानासाहेब आगळे
उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे , गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे , पोलीस निरीक्षक सचिन सानप , उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे , नोडल अधिकारी संदीप पाटील यांच्यासह महसूल , शिक्षण , गृह विभागातील अधिकारी , कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते . शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही . व्ही . घोंगडे , उपमुख्याध्यापिका कल्पना बनकर यांच्यासह शिक्षकांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले .
Comments
Post a Comment