१३ वर्षीय मुलीवर बलात्कार करून डोक्यात दगड टाकून निघृण खून..!
चोपडा प्रतिनिधी-
चोपडा तालुक्यातील एका गावातील शेतामध्ये एका १३ वर्षीय बालिकेच्या डोक्यात दगड टाकून अत्याचार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवार दि.७ सप्टेंबर रोजी रात्री ७ वाजता उघडकीस आली आहे.याप्रकरणी एका संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली असून चोपडा शहरापासून अवघ्या १२ किलोमीटरवर असलेल्या एका गावातील मोलमजुरी करणारा एक परिवार शेत शिवारामध्ये राहतो.या परिवारातील एक १३ वर्षीय मुलगी ही घराजवळ असताना संशयित आरोपी तेथे आला.त्याने या मुलीला शेतामध्ये ओढत नेऊन तिच्यावर बळजबरी करून अत्याचार केला.त्यानंतर तिची डोक्यात दगड टाकून निर्घुण हत्या केली.दरम्यान ही घटना आजूबाजूच्या ग्रामस्थांना समजताच त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला कळवले.यानंतर चोपडा शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच एलसीबी घटनास्थळी दाखल झाले होते.सदरील घटनेची माहिती जाणून घेत.यावेळी फॉरेनसिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली होती.तर मृतदेह चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला होता या घटनेमुळे चोपडासह जळगाव जिल्हा हादरला आहे.दिनांक ०७/०१/२०२४ रोजी दुपारी ०४.०० ते ०५.०० वाजेच्या दरम्यान विरवाडे शिवारातील पिडित मुलीचे आई वडील बटाईने केलेल्या शेतातून निंदणी करुन घरी परत चालत येत असतांना मुकेश पुन्या बारेला रा.मुळचा बलवाडी ता.वरला जि.बडवाणी (म.प्र) सध्या रा.पाटचारी जवळ चोपड़ा याने त्यांचे मागोमाग येथून विरवाडे शिवारातील वाध्या नाला येथे पिडीतेला पकडून जवळच असलेल्या भगवान गोटू पाटील यांच्या कपाशी पिकाचे शेतात नेवून तिचे कपडे काढून विवस्त्र करून तिच्यावर जबरदस्तीने दुष्कर्म करुन तिच्या डोक्यात दगड टाकून तिला ठार मारले व तिचा मृतदेह त्याच शेतात आत मध्ये कपाशीचे पिकात टाकून दिला सदरील आरोपी मुकेश पुन्या बारेला.मुळचा रा बलवाडी ता.वरला बडवाणी (म.प्र) सध्या रा.ह.मु पाटचारी जवळ चोपडा याचे विरुद्ध चोपड़ा शहर पोस्टे (भाग५)सीसीटीएनएस ४४/२०२४ भा.न्या.सं.कलम ६५,६६,१०३(१) पोस्को ४,८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून
पोलीस अधिक्षक माहेश्वर रेड्डी जळगाव,पोलीस अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर चाळीसगाव परिमंडळ ,पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे चोपड़ा भाग चोपडा,पोलीस निरीक्षक बबन आजाड स्था गुन्हे जळगाव
पोलीस निरीक्षक कावेरी कमलकर चोपड़ा ग्रामिण पो.स्टे.पोलीस निरीक्षक मधुकर साळचे चोपडा शहर पो.स्टे.सपोनि,एकनाथ भिरी चोपडा शहर पोलीस स्टेशन