भ्रष्टाचार निर्मूलन जनहित संघाच्या वतीने वनविभागाच्या विरुद्ध बसलेल्या उपोषणाची अखेर सांगता.
सुसरी.ता.भुसावळ येथील वनविभागाच्या अखत्यारीत असलेला राखेच्या तलावातून राख माफिया यांनी तलावाच्या 100 शंभर फूट उंचीच्या भिंती तोडून व आत मधी शिरून त्यातील 30-35 वर्षाचे असलेल्या लाखो झाडांची कत्तल करून तसेच त्यातील वन्य जीव प्राण्यांचा अधिवास संपवत तसेच पर्यावरणाचा ऱ्हास करत चोरटी वाहतूक करत होते त्याबाबत भ्रष्टाचार निर्मूलन जनहित संघ (भारत) च्या वतीने दिनांक 18/9/24 रोजी (DFO) वनविभाग कार्यालय जळगांव येथे असंख्य कार्यकर्त्या समवेत आमरण उपोषण सुरू होते त्या उपोषणातील मागण्या या अशा होत्या( 1)तात्काळ चौकशी समिती गठीत करण्यात यावी चौकशी समितीत तक्रार दाराला समाविष्ट करण्यात यावे ( 2) तलावातील लाखो झाडे तोडून पर्यावरणाचा जो ऱ्हास करण्यात आला त्याची चौकशी करणे (3) तलावाची 100 शंभर फूट उंचीच्या भिंती तोडण्यात आल्या त्या भिंती बांधण्यात याव्या( 4) वनविभागाच्या तलावातून जे चोरटी वाहतूक होत आहे ती कायम स्वरुपी बंद करून वाहने जप्त करण्यात यावे ( 5) वरील सर्व विषयाला ज्या अधिकारी/ कर्मचारी यांनी सहकार्य केले त्यांना निलंबित करून. तात्काळ बदली करण्यात यावी व रस्ते ताबडतोब दुरुस्त करून मिळावे असे DFO साहेब यांनी त्यांच्या सहीने लेटर देऊन मागण्या पूर्ण केल्याने सदरचे उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले आहेत चौकशी समितीत अधिकारी यांनी दिरंगाई केल्यास व पत्रामध्ये लेखी आश्वासना नुसार कारवाई न झाल्यास पुढील अंदोलनाची दिशा बदलून मंत्रालय मुंबई येथे व धुळे येथे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देऊन भ्रष्टाचार निर्मूलन जनहित संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तमराव इंगळे यांनी समाज सेवक व भावी आमदार शिवराम पाटील तसेच सब DFO यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषणाची सांगता केली