धरणगाव शहरात २४ सप्टेंबर २०२४ मंगळवार रोजी शिवराज्याभिषेक दिन व सत्यशोधक समाज वर्धापन दिन सोहळा साजरा !

धरणगाव शहरात प्रथमच सत्यशोधक झेंड्याची  निघाली मिरवणूक - रामकृष्ण महाजन.
धरणगांव प्रतिनिधी - पी डी पाटील सर

धरणगांव - २४ सप्टेंबर २०२४ मंगळवार रोजी शाक्त शिवराज्याभिषेक दिन व सत्यशोधक समाज स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक दिनाला ३५० वर्षे पूर्ण झाले तसेच सत्यशोधक समाज स्थापना दिनाला १५१ वर्षे पूर्ण झाले त्यानिमित्ताने धरणगाव शहरात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा सत्यशोधक समाज संघाच्या झेंड्याची मिरवणूक काढण्यात आली.
          कार्यक्रमाचे प्रास्ताविक RTI चे जिल्हाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ यांनी केले. सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक पी डी पाटील यांनी शाक्त राज्यभिषेक दिन व सत्यशोधक स्थापना दिनाचे महत्त्व सांगितले. लहान माळीवाडा माळी व पाटील समाज मढी येथे मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवराय, महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सत्यशोधक झेंड्याचे पूजन करून मिरवणूक काढण्यात आली. लहान माळीवाडा येथून मिरवणुकीला सुरुवात झाली यानंतर मोठा माळीवाडा समाज मढी येथे झेंडा लावण्यात आला यानंतर धरणी चौकात राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मारकाला अभिवादन करून कोट बाजार मार्गे लालबहादूर शास्त्री स्मारकाला अभिवादन केले यानंतर सावित्रीबाई फुले उड्डाणपुलाजवळ विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला अभिवादन करून रॅलीचा समारोप झाला.
         याप्रसंगी लहान माळीवाडा माळी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, विठोबा महाजन,पाटील समाजाचे अध्यक्ष माधवराव पाटील, चौधरी समाजाचे अध्यक्ष सुनील चौधरी, जैन समाजाचे अध्यक्ष राहुल जैन तसेच पंचमंडळ व शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
           कार्यक्रम यशस्वीतेसाठी आबासाहेब राजेंद्र वाघ, लक्ष्मणराव पाटील, एच डी माळी, गोरख देशमुख, पी डी पाटील, भुषण भागवत, मयूर भामरे, गोपाल माळी यांनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।