आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे हिंदी दिवस साजरा !..राष्ट्रभाषा हिंदीचा प्रचार - प्रसार करणे हे आपले कर्तव्य - प्रा.पी.डी.पाटील


भडगांव /प्रतिनीधी

भडगांव - शहरातील आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे "हिंदी दिवस " मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वामिनी पाटील यांनी केले. 
         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे हिंदी विषय शिक्षक पी डी पाटील होते. सर्वप्रथम संत कबीर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी हिंदी विषयाचे पोस्टर तयार केले व योगिता महाजन या विद्यार्थिनींनी हिंदी दिवसाचे महत्त्व सांगितले. खुशी सोनार या विद्यार्थिनीने हिंदी लेखकांची माहिती व त्यांचा जीवन परिचय सांगितला.
          कार्यक्रमाचे अध्यक्ष पी डी पाटील यांनी हिंदी विषयाचे महत्त्व व इतिहास विस्तृतपणे सांगितला. हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे तिचा प्रचार प्रसार करणे आपले कर्तव्य आहे असे प्रतिपादन पाटील यांनी केले. आजच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी हिंदीतून संभाषण केले. उत्कृष्ट मनोगत व गायन करणाऱ्या विद्यार्थिनींना महापुरुषांचे अनमोल ग्रंथ हिंदी विषय शिक्षक पी डी पाटील यांच्याकडून भेट देण्यात आले.
            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदिनी सोळसे तर आभार अश्विनी मांडोळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।