झुरखेडा हायस्कूल खो - खो संघ जिल्हा उपविजयी !...

उपविजयी संघाचे मनस्वी अभिनंदन - वाय.पी.पाटील. ( मुख्याध्यापक ) 
                                                    धरणगाव प्रतिनिधी -  पी डी पाटील सर 

धरणगांव -  दिनांक २६/०९/२०२४    तालुक्यातील निळकंठेश्वर  शिक्षण प्रसारक मंडळ संचलित झुरखेडा हायस्कूल झुरखेडा – निमखेडा ता.धरणगाव, जि.जळगाव विद्यालयाच्या १७ वर्षा आतील मुलींचा संघ जिल्हा स्तरावर उपविजयी झाला तालुका स्तरावर विजयी झाल्या नंतर जिल्हा स्तरावर साखळी सामन्यात पहिल्यांदा मुक्ताईनगर संघाचा एक डाव तीन गुणांनी पराभव करून दुसऱ्या साखळी सामन्यात पाचोरा संघाला तीन गुणांनी पराभव केले. व उपांत्यपूर्व (सेमी फाईनल) सामन्यामध्ये चाळीसगाव तीन गुणांनी पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला आणि अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात भडगाव संघाशी केवळ एक गुणांनी संघ पराभूत होऊन जिल्हा उपविजयी ठरला.
       संघ यशस्वी होण्यासाठी संघ व्यवस्थापक श्री. के,एस,पाटील सर. व श्री. आर,आर,पाटील सर. यांनी कठोर परिश्रम घेतले तसेच संघातील खेडाळू दिव्या मालचे, पायल नन्नवरे, सानिया खाटीक, धनश्री बाविस्कर, रुचिता सपकाळे, साधना महाले, चैताली गोसावी, निकिता सपकाळे, जागृती पवार, दिव्या चौधरी, दिव्या लक्ष्मण मालचे, आरुषी चौधरी, अंजली सोनवणे, नेहा चौधरी, प्रिया अहिरे या विद्यार्थिनीनी अत्यंत मेहनत घेऊन संघाला जिल्हा उपविजय केले. उपविजय संघाचे संस्था अध्यक्ष आबासो.श्री.पी.सी.पाटील तसेच कार्यकारणीतील सर्व सदस्य मुख्याध्यापक श्री. वाय.पी.पाटील.सर यांनी संघाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच मुख्याध्यापक श्री.वाय.पी.पाटील.सर यांनी संघाला मार्गदर्शन केले तसेच श्री.जी.पी.पवार सर, श्री.एन.बी.चौधरी सर यांनी मार्गदर्शन केलेसंस्थेच्या वतीने अध्यक्ष आबासो.श्री.पी.सी.पाटील यांनी विद्यार्थिनीनी व क्रीडा शिक्षक श्री.के.एस.पाटील सर तसेच श्री.आर.आर.पाटील सर यांचा सन्मान केला जिल्हा उपविजयी संघाला महाराष्ट्र खो-खो- असोसिएशनचे सचिव श्री.शेखर पोळ सर, जिल्हा मार्गदर्शक श्री.मिनल थोरात सर, राहुल पोळ सर, श्री.विशाल राजपूत सर यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. जिल्हा उपविजयी संघाचे संपूर्ण संस्थेच्या वतीने व संपूर्ण शाखांच्या वतीने व तसेच झुरखेडा व निमखेडा गावातील नागरीकांनी अभिनंदन केले आहे.

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।