बुधवार, दि.२ ऑक्टोबर २०२४ रोजी येवला येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचा लोकार्पण शानदार कार्यक्रम सोहळा...।
जामनेर/शांताराम झाल्टे
बुधवार, दि.२ ऑक्टोबर २०२४ रोजी येवला येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचा लोकार्पण शानदार कार्यक्रम सोहळा...।
नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी / ( डॉ. शेरूभाई मोमीन, येवला )
बुधवार, दि.२ ऑक्टोबर २०२४ रोजी येवला येथे
आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, युगप्रवर्तक निधर्मीय रयतेचे राजे कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची महती, स्वराज्य कार्यात त्यांना मोलाची साथ देणारे विविध सेनापती यांचा अभिमानास्पद ईतिहास यांची अनुभूती देण्यासाठी आपल्या येवला शहरात आपल्या प्रयत्नांतून भव्य शिवसृष्टी साकारत आहे...
या ठिकाणी स्थापन करण्यासाठी महाराजांच सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे आपल्या येवला शहरात २२ सप्टेंबर रोजी अत्यंत आनंदाच्या वातावरणात व जल्लोषात आगमन झालेले आहे.
आता या भव्य शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण
सायंकाळी ४ वाजता जनता विद्यालय प्रांगण, विंचूर रोड, येवला, जि. नाशिक येथे सोहळा पार पाडला जाणार आहे
तरी या कार्यक्रमा ठिकाणी सर्व समस्त शिवप्रेमी नागरिकांना आग्रहाचे निमंत्रण करण्यात येत आहे, आपण सर्वांनी या, भव्य शानदार सोहळ्यात नक्की उपस्थित रहावे....!
Comments
Post a Comment