जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रवंजे बुद्रुक या शाळेमध्ये सत्कार समारंभाचा उत्कृष्ट कार्यक्रम संपन्न.।
रवंजा बु, ता, एरंडोल जवळ असलेले
रिंगणगाव केंद्राची माहे सप्टेंबर 2024 ची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रवंजे बुद्रुक या शाळेत उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित करण्यात आले। असून
या कार्यक्रमात प्रथम भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून शाळेचे उपशिक्षक श्री गोविंदा वंजारी सर यांनी केले त्यानंतर शिक्षण परिषदेच्या अध्यक्ष स्थानी रिंगणगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती मनिषा सोनवणे मॅडम यांनी भूषवले. त्यानंतर रिगणगाव केंद्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींचे इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन आणि इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनी यांनी स्वागत गीत सादर करून त्यांचे स्वागत केले .
पहिलीच्या विद्यार्थिनींनी परिषदेस आलेल्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांचे गुलाब पुष्प आणि भेट देऊन त्यांचे स्वागत केले तर नंतर रिंगणगाव केंद्रातील सावदे प्र.चा शाळेचे मुख्याध्यापक श्री हरचंद महाजन सर यांना जिल्हा पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वागत आणि सत्कार जि प केंद्र शाळा रिंगणगाव व जि प शाळा रवंजे यांच्यावतीने करण्यात आले।
त्यानंतर खर्ची खुर्द शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचा उत्कृष्ट कार्यानिमीत्त सत्कार करण्यात आला. सर्व तासिका ह्या नियोजनाप्रमाणे घेण्यात आल्या नंतर महावाचन उपक्रमांतर्गत शंभर टक्के अहवाल नोंदणी करणाऱ्या शाळेचे मुख्याध्यापक श्री चित्ते सर यांचे व त्यांच्या सर्व शिक्षकांचे केंद्राच्या वतीने स्वागत करण्यात आले केंद्रीय परिषदेला रिंगणगाव केंद्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी उपस्थित होत्या.
तसेच शाळेतील उपशिक्षिका माननीय सौ रेखा पाटील मॅडम यांनी इयत्ता तिसरी गणित विषयाचा आदर्श नमुना पाठ सादर केला, उपस्थित सर्व शिक्षकांनी आदर्श नमुना पाठ उत्तम प्रकारे सादर केल्याबद्दल सौ रेखा पाटील मॅडम यांचे कौतुक केले.सदर परिषद यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रवंजे बुद्रुक येथील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योती पाखरे मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन श्रीमती नीता पाटील मॅडम यांनी केले.
Comments
Post a Comment