चलो जळगाव,चलो जळगाव,चलो जळगाव शिक्षक ,शाळा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी जळगाव येथे सामुहिक रजा आंदोलन व भव्य महामोर्चा...।
जामनेर/शांताराम झाल्टे
जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिति च्या वतीने दि.२५/०९/२०२४ वार बुधवार रोजी वेळ सकाळी अकरा वाजता सामुहिक रजा आंदोलन व भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहेत।
मोर्चा ची सुरूवात जिल्हा परिषद जळगाव येथून निघणार असून सांगता जिलाधिकारी कार्यालय जळगाव येथे आयोजित करण्यात आलेले आहे ।
महाराष्ट्र राज्य सर्व प्राथमिक शिक्षक संघटना शिक्षक ,शाळा आणि विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी या मोर्चाचे धोरण आहे।
मोर्चाची पहिली मागणी असे की १) पंधरा मार्च व पाच सप्टेंबर चा संचमान्यता जी आर रद्द करण्यात यावा.
२)आम्हाला शिकवू द्या अशैक्षणिक कामे बंद करा.
३)शाळा आणि शिक्षणांचे खाजगीकरण ,कंत्राटीकरण बंद करा.
४)बेसुमार उपक्रमांचा भडिमार बंद करा.
या मागण्यांद्वारे व न्याय हक्का साठी भव्य महामोर्चा मध्ये जळगाव जिल्ह्यातील सर्व शिक्षक,व विद्यार्थ्यांच्या भविष्यसाठी हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितिद्वारे केले जात आहे.।