धरणगांवात "शाक्त शिवराज्याभिषेक दिन " व "सत्यशोधक समाज स्थापना दिन "२४ सप्टेंबर रोजी होणार साजरा !.....२४ सप्टेंबर हा दिवस सण उत्सवा सारखा साजरा करा !... - पी डी पाटील ( जिल्हा समन्वयक - सत्यशोधक समाज संघ )

जामनेर/शांताराम झाल्टे 

धरणगांव - धरणगाव शहरात २४ सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती शिवराय " शाक्त राज्याभिषेक दिन "व " सत्यशोधक समाज स्थापना दिन " मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
        रयतेचे राजे - कुळवाडीभूषण - बहुजन प्रतिपालक - छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला दुसरा राज्याभिषेक शाक्त पद्धतीने २४ सप्टेंबर १६७४ रोजी केला होता. या देशात आधुनिक भारताचे शिल्पकार राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून एक नव्हे तर दहा दिवसाची शिवजयंती सुरू केली म्हणून खऱ्या अर्थाने शिवजयंतीचे जनक तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले आहेत. तात्यासाहेबांनी छत्रपतींना गुरु मानुन २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.  
            "सर्वसाक्षी जगत्पती त्यासं नकोच मध्यस्ती " हे सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य होते. यावर्षी शिवराज्याभिषेक दिनाला ३५० वर्ष पूर्ण होत आहे व सत्यशोधक समाजाला १५१ वर्ष पूर्ण होत आहे हे दोन्ही दिवस आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत. येत्या २४ सप्टेंबरला धरणगाव शहरात सत्यशोधक समाज संघाच्या ध्वजाची मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने शहरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित रहावे. सर्व शिवराय - फुले - शाहू - आंबेडकर यांना आदर्श मानणाऱ्या सर्व जळगाव जिल्हा वासियांनी हा दिवस सण उत्सवासारखा साजरा करावा असे आवाहन सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक पी डी पाटील यांनी केले आहे.

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।