शिरपूर येथील राजेसिंग पावरा सर यांना २०२४ चा ज्ञानदीप उपक्रमशिल आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त.।
प्राप्तज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान पुरस्कार सोहळा दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी वार रविवार सकाळी 11 वाजता एस एम पटेल मेमोरियल हॉल फार्मसी ग्राउंड शिरपूर येथे आयोजित करण्यात आला होता. श्री. राजेसिंग पावरा सर हे नगर परिषद प्राथमिक शाळा क्र.३ शिरपूर येथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष मनोहर वाघ सर आणि अध्यक्ष योगेश्वर मोरे सर यांनी अथक परिश्रम घेतले.ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान कुरखळी शिरपूर यांच्यामार्फत आयोजित विविध पुरस्कार सोहळ्यामध्ये राजेसिंग पावरा यांना उपक्रमशिल आदर्श शिक्षक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या पुरस्काराच्या प्रस्तावामधून एकूण 28 प्रस्ताव आले होते त्यामधून 28 प्रस्तावांची पडताळणी करून निवड चाचणी समितीने राजेसिंग पावरा यांचे कार्याचे दखल घेत त्यांना उपक्रमशिल आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी पात्र ठरविले दिनांक 15 सप्टेंबर रोजी एस एम पटेल हॉल शिरपूर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष मनोहर वाघ सर अध्यक्ष योगेश्वर मोरे सर यांच्या अथक परिश्रमाने प्रयत्नांनी विविध पुरस्काराचे वितरण केले गेले विविध क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याला वंदन करत पुरस्कार दिले गेले क्रीडा लोकसेवा समाजसेवा कला शिक्षण अशा विविध प्रकारचे पुरस्काराचे वितरण केले गेले