महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्या बाबत आवश्यक तो कायदा करावा : जयसिंग वाघ
महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्या बाबत आवश्यक तो कायदा करावा : जयसिंग वाघ ------------------------------------------------ मुख्य संपादक/शांताराम झाल्टे जामनेर जळगाव :- बिहार येथील जगप्रसिद्ध महाबोधी महाविहार आजही बौद्धांच्या ताब्यात नसल्याने बौद्ध संस्कृतीचे जतन , संवर्धन करणे कठीण होत आहे ,अन्य धर्मीय लोक तिथं त्यांची पूजा अर्चा , धार्मिक विधी करतात तसेच पर्यटकांना चुकीची माहिती देतात . महाविहार हे बौद्ध जनतेच्या पूजेचे , श्रद्धेचे , भावनांचे स्थळ असल्याने ते बौद्धांच्याच ताब्यात असणे आवश्यक आहे त्या करिता आवश्यक तो स्वतंत्र कायदा बिहार सरकारने करावा असे स्पष्ट प्रतिपादन साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले. महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणी करिता पंधरा दिवसांपासून जगभरातील शेकडो बौद्ध भिख्खू बुद्धगया येथे आंदोलन करीत आहेत त्या आंदोलनास पाठिंबा म्हणून जळगाव येथील अजिंठा हाउसिंग सोसायटी तर्फे राष्ट्रपतींना जळगाव जिल्हाधिकारी यांचे मार्फत एक...