Posts

Showing posts from September, 2024

शिवकमल शैक्षणिक व सामाजिक संस्था आयोजित पुरस्कार वितरण कार्यगौरव सोहळा उत्साहात संपन्न...।

Image
जामनेर/ शांताराम झाल्टे  एरंडोल येथे शिवकमल शैक्षणिक व सामाजिक संस्था उत्राण आयोजित पुरस्कार वितरण व कार्यगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला असून सुरवातीला दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि कार्यक्रम प्रसंगी व्याख्याते प्रा. सचिन देवरे यांचे व्याख्यान झाले तसेच समाधा पाटील यांनी कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती सदर कार्यक्रमात दिली आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, कृषी, उद्योग व व्यवसाय क्षेत्रात सन २०२३-२४ मध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील ३५ पुरस्कार प्राप्त पुरस्करार्थिंना कार्य गौरव करून विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था अध्यक्ष अमोल महाजन यांनी केले तर ज्ञानेश्वर आमले, वासुदेव पाटील, मनोहर ढीवरे, मोनिका शिंपी यांनी मनोगत व्यक्त केले तर आबासाहेब चिमणराव पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले असून सूत्रसंचलन प्रा.शुभांगी परदेशी यांनी तर आभार सुजाता अत्तरदे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुरस्कार निवड व वितरण समिती प्रमुख विलास महाजन, संस्था सचिव रेणुका महाजन,...

बुधवार, दि.२ ऑक्टोबर २०२४ रोजी येवला येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचा लोकार्पण शानदार कार्यक्रम सोहळा...।

Image
जामनेर/शांताराम झाल्टे  बुधवार, दि.२ ऑक्टोबर २०२४ रोजी येवला येथे  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचा  लोकार्पण शानदार कार्यक्रम सोहळा...।  नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी / ( डॉ. शेरूभाई मोमीन, येवला )  बुधवार, दि.२ ऑक्टोबर २०२४ रोजी येवला येथे      आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, युगप्रवर्तक निधर्मीय रयतेचे राजे कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची महती, स्वराज्य कार्यात त्यांना मोलाची साथ देणारे विविध सेनापती यांचा अभिमानास्पद ईतिहास यांची अनुभूती देण्यासाठी आपल्या येवला शहरात आपल्या प्रयत्नांतून भव्य शिवसृष्टी साकारत आहे... या ठिकाणी स्थापन करण्यासाठी महाराजांच सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे आपल्या येवला शहरात २२ सप्टेंबर रोजी अत्यंत आनंदाच्या वातावरणात व जल्लोषात आगमन झालेले आहे. आता या भव्य शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण   सायंकाळी ४ वाजता  जनता विद्यालय प्रांगण, विंचूर रोड, येवला, जि. नाशिक येथे  सोहळा पार पाडल...

पहूर येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा !

Image
भ्रष्टाचार निर्मूलनासाठी माहिती अधिकाराचा प्रभावी वापर महत्त्वाचा - शंकर भामेरे जामनेर/शांताराम झाल्टे  पहूर .ता , जामनेर भ्रष्टाचार निर्मूलनासाठी माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे तालुका मुख्य संघटक शंकर भामेरे यांनी केले . येथील पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटी संचलित आर .टी .लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तसेच महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित डॉ . हेडगेवार प्राथमिक विद्यालय व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात आयोजित आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन  जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते .           भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी माहिती अधिकार अत्यंत प्रभावी माध्यम आहे . माहिती अधिकार कायद्याची व्यापक जनजागृती व्हावी यासाठी २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो .        आर .टी .लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मुख्याध्यापक सुरेश सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . यावेळी माहिती अधिकार ...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रवंजे बुद्रुक या शाळेमध्ये सत्कार समारंभाचा उत्कृष्ट कार्यक्रम संपन्न.।

Image
जामनेर/शांताराम झाल्टे  रवंजा बु, ता, एरंडोल जवळ असलेले रिंगणगाव केंद्राची माहे सप्टेंबर 2024 ची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रवंजे बुद्रुक या शाळेत उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित करण्यात आले। असून   या कार्यक्रमात प्रथम भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून शाळेचे उपशिक्षक श्री गोविंदा वंजारी सर यांनी केले त्यानंतर शिक्षण परिषदेच्या अध्यक्ष स्थानी रिंगणगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती मनिषा सोनवणे मॅडम यांनी भूषवले. त्यानंतर रिगणगाव केंद्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींचे इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन आणि इयत्ता पहिलीच्या  विद्यार्थिनी यांनी स्वागत गीत सादर करून त्यांचे स्वागत केले .   पहिलीच्या विद्यार्थिनींनी परिषदेस आलेल्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांचे गुलाब पुष्प आणि भेट देऊन त्यांचे स्वागत केले तर नंतर रिंगणगाव केंद्रातील सावदे प्र.चा शाळेचे मुख्याध्यापक श्री हरचंद महाजन सर यांना जिल्हा पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वागत आणि सत्कार जि प केंद्र शाळा रिंगणगाव ...

जामनेर तालुक्यात जागतिक रेबीज दिन साजरा.। कुत्रा असो किंवा प्राणी असो यांनी चावा घेतल्यानंतर २४ तासात अँटी रेबीज लस घ्यावी ...डॉ.राजेश सोनवणे.।

Image
जामनेर/शांताराम झाल्टे  जामनेर तालुका रेबीज लस उपलब्ध साठा खालील प्रमाणे-- १)उपजिल्हा रुग्णालय जामनेर -२०० २)ग्रामीण रुग्णालय पहुर -१२० ३)प्राथमिक आरोग्य केंद्र बेटावद-३० ४)प्राथमिक आरोग्य केंद्र गारखेडा-२० ५)प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी -३२ ६)प्राथमिक आरोग्य केंद्र फत्तेपुर -३९ ७)प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदूर्णी-९० ८)प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी-६९ ९)प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोद ४० याठिकाणी करण्यात आले आहे। संचालक आरोग्य सेवा हिवताप,हत्तीरोग व जलजन्य रोग महाराष्ट्र राज्य, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. बाळासाहेब वाबळे यांच्या आदेशानुसार जामनेर तालुक्यात जागतिक रेबीज दिन साजरा करण्यात आला.यानिमीत्ताने तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रेबीज विषयक सविस्तर माहिती देण्यात आली.तसेच नागरिकांना प्राणी किंवा कुत्रा लावल्यानंतर घ्यावयाची काळजी,पाळीव प्राण्यांना रेबीज लस देऊन प्राण्यांचे रेबीज पासून स्वरक्षण करण्याबाबत माहिती देण्यात आली.पूर्वी बेंबीच्या बाजूने १४ इंजेक्शन यासाठी देण्यात येत होते परंतु आता संशोधन होऊन स...

पुणे येथे भव्य मुस्लिम समाजातिल महाअधिवेशन साठी नेते गण रवाना.।

Image
 नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :- ( डॉ. शेरूभाई मोमीन, येवला )        आज  पुणे येथे वक्फ आमेनमेंट बिल  2024  चे, महा अधिवेशन, यासाठी नाशिक येथील, समस्त सकल मुस्लिम  समाजाचे जनजागृती समाज जोडो संकल्प अभियान भव्य सभेसाठी  जाताना नाशिक येथील प्रसिद्ध सरपंच मिसळ  चा आस्वाद  घेत  पुणे  येथे रवाना, झाले आहे  नाशिकशहर जिल्हा येथून आदर्श समाजभूषण कार्यसम्राट मा.शेख हनीफ बशीर, शहराध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग,        तसेच, जेष्ठ नेते अँड.अन्सारभाई सैय्यद सर , फारूक बागवान, मोबीन मुलतानी, आदम मोमीन, आश्रफ मोमीन, अल्ताफ पठाण, पत्रकार फैयाज पठाण, समाजसेवक शमुभाई सैय्यद, दाऊद शेख, आदी सह सदस्य पदाधिकारी हितचिंतक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित हो ते..

जळगाव येथे सत्यशोधक समाज स्थापना दिना निमित्त विविध कार्यक्रम संपन्न. !

समाजाच्या पलीकडे जाऊन धर्मनिरपेक्ष कुटुंबाचा क्रांतदर्शी विचार महात्मा फुलेंनी दिला : गणपत धुमाळे विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करावी : विजय लुल्हे (जिल्हा समन्वयक सत्यशोधक समाज संघ )   जामनेर/ शांताराम झाल्टे  जळगांव - ' समाजाच्या पलीकडे जाऊन धर्मनिरपेक्ष कुटुंबाचा क्रांतीदर्शी विचार महात्मा फुले यांनी दिला.आजकालची शिक्षण पद्धती ही कॉपी-पेस्ट प्रमाणे झाली आहे.युरोपियन राज्यघटना व भारतीय राज्यघटनेतील मूलभूत फरक सोदाहरण सांगून धर्मसत्तेच्या नियमबाह्य घटनांवर पायबंद घालण्याचा महत्वाचा लोकसत्ताक अधिकार डॉ.बाबासाहेबांनी संविधानाने द्रष्टेपणाने दिला आहे.अल्पसंख्यांकांना कायदेशीर अधिकार व सुरक्षा प्रदान केली आहे. ' असे प्रतिपादन गणपत धुमाळे ( सहाय्यक प्राध्यापक , एस.एस. मणियार महाविद्यालय जळगाव ) यांनी केले.महात्मा जोतिराव फुले स्थापित सत्यशोधक समाजाच्या १५१ व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या व्याख्याना प्रसंगी दि .२४ सप्टेंबर २०२४ रोजी विद्यार्थी सहाय्यक समिती जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून मार्गदर्शन करतांना धुमाळे बोलत होते.       ...